DAV PUBLIC SCHOOL, NEW PANVEL (SELF FINANCE)

SEC-10, NEW PANVEL, C.B.S.E. AFFILIATION NO.-1130065, SCHOOL CODE-30042, UDISE NO.-27240818829, (UPTO +2 LEVEL) MAHARASHTRA - 410206

करुणेश्वर वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट  

 डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल नवीन पनवेलच्या व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी करुणेश्वर वृद्धाश्रमाला भेट देऊन एक आगळावेगळा उपक्रम राबवला. केवळ पुस्तकी शिक्षण न घेता समाजातील जेष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून त्यांच्याशी संवाद साधणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.

व्यवस्थापन प्रतिनिधींनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी संवाद साधला. आजी-आजोबांसोबत वेळ घालवून  त्यांच्या आयुष्यातील अनुभव ऐकले. अनेक ज्येष्ठांनी जुन्या आठवणींना उजाळा देत  भाऊक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

शाळा व्यवस्थापनातर्फे श्री अनिल राव (डी.ए.व्ही मॅनेजिंग कमिटी नवी दिल्ली) यांच्या हस्ते वृद्धाश्रमाला दैनंदिन गरजेच्या वस्तू जसे की; धान्य, तांदूळ, डाळ, फळे इत्यादी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी सिम्मी जुनेजा ( आर. ओ. महाराष्ट्र व गुजरात) तसेच डी.ए.व्ही  पब्लिक स्कूल मुलुंड, ठाणे, ऐरोली ,नेरूळ येथील प्राचार्य उपस्थित होत्या.

डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल पनवेलचे प्राचार्य श्री सुमंत घोष यांनी आई-वडिलांची आणि ज्येष्ठांची सेवा करणं किती महत्त्वाचे आहे हे आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळते असे नमूद केले. कार्यक्रमाची सांगता वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने झाली.  या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 


 
 
Contact Us ↓
 

DAV PUBLIC SCHOOL, NEW PANVEL

PLOT NO.267,268, SECTOR-10,
NEW PANVEL, NAVI MUMBAI,
RAIGAD, MAHARASHTRA - 410206
Email ID : [email protected]
Phone No. : 8451053473

Website : www.davnewpanvel.com


Like Us on:
     
Location Map ↓