मराठी अभिजात भाषा सप्ताह
Event Start Date : 11/10/2025 Event End Date 29/02/2028
डी. ए. वी.पब्लिक स्कूल नवीन पनवेल येथे दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ ते ९ ऑक्टोबर २०२५ या सप्ताहात शाळेचे प्राचार्य श्री सुमंत घोष यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी अभिजात भाषा सप्ताह या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
दिनांक ३ ऑक्टोबर रोजी विशेष प्रार्थना सभेचे आयोजन केले गेले. या दिवशी इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध काळातील मराठी साहित्यिकांची वेशभूषा परिधान करून मराठी साहित्या विषयी माहिती प्रसारित केली.
दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जवळजवळ ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी उत्कृष्ट तीन निबंधांना गौरवण्यात आले.
दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कविता वाचन स्पर्धेचे आयोजन केले होते. विविध कवी कवयित्रींच्या कवितांचे अतिशय उत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. यापैकी उत्कृष्ट कविता वाचनास गौरवण्यात आले .
दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी बडबड गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते ज्यामध्ये इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. उत्कृष्ट तीन बडबड गीते सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी या अभिजात मराठी भाषा सप्ताहाची सांगता करण्यात आली. इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर विविध उपक्रमांच्या आयोजनातून या सप्ताहाचा समारोप समारंभ करण्यात आला. या समारंभासाठी समन्वयिका सौ.पूजा विचारे, सौ पौर्णिमा तिरोडकर, मराठी विभाग प्रमुख सौ.वृषाली नाईक, मराठी विभागातील शिक्षक व इतर शिक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे उत्तम सादरीकरण व श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे कार्यक्रम रंगतच गेला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख सौ वृषाली नाईक यांनी केले तर अध्यक्षीय भाषणात सौ पौर्णिमा तिरोडकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे तोंड भरून कौतुक केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मराठी विषय शिक्षक श्री संदेश घरत यांनी घेतली होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सचिन जाधव यांनी केले.
अशा पद्धतीने हा अभिजात मराठी भाषा सप्ताह डी. ए. वी. पब्लिक स्कूल विद्यालयात अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला.


